वाचन का गरजेचे आहे…. हे स्पष्ट करणारे ७ पैलू …

वाचल्याने काय होते?
हा प्रश्न सहसा कुणाला पडणार नाही..परंतु स्मार्टफोन व इंटरनेटच्या जमान्यात एकाग्र वाचण्याचे महत्व तसे कमीच झालेले आहे. किंबहुना स्मार्टफोनवरील व्यतीत केलेल्या  १० मिनिटात माणूस ५ ते ६ प्रकारची वेगवेगळ्या अँप्सचा वापर करत असतो आणि त्यामुळे “एकाग्रता” ही अशी राहताच नाही.
इंटरनेटवर अथवा पुस्तकांच्या स्वरूपात ज्ञानाचे भांडार खुले असताना देखील आपला वेळ सोशल मीडिया अपडेट्स वाचण्यात अथवा इतर गोष्टी काण्यात जात असतो.  त्या वेळेमधील काही वेळ वाचनासाठी दिल्यास अनेक चांगल्या गोष्टी साध्य होऊ शकतात.
वाचन का गरजेचे आहे याचे काही पैलू

१) वाचण्यामुळे मेंदूचा व्यायाम होतो

तज्ज्ञांच्या नुसार वाचन केल्याने आपल्या मेनूमध्ये असणारे न्यूरॉन्स सक्रिय होतात आणि आपली मानसिक स्थिती संतुलित राहण्यास मदत होते. वाचनामुळे माणूस औदासिन्यात (म्हणजेच depression) जाण्याची शक्यता कमी असते….  हीच शक्यता सोशल मीडियाच्या वापरामुळे बळावते.

२) वाचण्यामुळे ज्ञानात भर पडते

वेगवेगळ्य्या विषयांवरील वेगवेगळे साहित्य वाचल्यामुळे आपल्या ज्ञानात भरच पडत असते. कोणत्याही गोष्टीची इत्यंभूत माहिती मिळविण्यासाठी त्या गोष्टीसंदर्भात वाचन करणे खूपच गरजेचे असते.

३) वाचण्यामुळे इतिहास समजण्यास मदत होते

वास्तविक पाहावयास गेलं तर या जगाचा इतिहास खूपच रोमांचक आहे.  इतिहासाचा हा रोमांच आपल्याला पुस्र्के वाचण्यामुळे मिळू शकतो या एकदा त्यामध्ये विशिष्ट रुची निर्माण झाली की माणूस इतिहासाचे अधिकाधिक वाचन करावयास लागतो.

४) वाचण्यामुळे प्रेरणा मिळते

आयुष्या जगताना आपणास अनेक प्रकारच्या संकटाना तोंड द्यावे लागते. अनेक प्रकारच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. या सर्वातून मार्ग काढण्यासाठी आपल्याला आपण केलेले वाचन अनेक वेळा उपयोगी ठरू शकते. विविध विचारवंतांचे विचार वाचल्याने आपल्याला प्रेरणा मिळू शकते आणि आपण आयुष्यावर जास्त प्रमाणात प्रेम करू लागतो.

५) शब्दकोश व भाषाज्ञान व व्याकरण वाढण्यास मदत होते

वाचत असल्याने आपल्याला अनेक भाषेतील अनेक शब्दांचे ज्ञान मिळू शकते. एकाच शब्दाचे असणारे अनेक अर्थ अथवा एकाच अर्थाचे अनेक शब्द हे आपल्याला वाचनामुळेच समजू शकतात. कोणत्याही भाषेचे आकलन जाण्यासाठी आणि व्याकरण/लहेजा जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या भाषेतील साहित्य जास्तीत जासत प्रमाणात वाचणे गरजेचे आहे

६) लिहीत असाल तर वाचणे गरजचे

वर म्हटल्याप्रमाणे, एखाद्या भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी त्या भाषेचचे जास्तीत जास्त  साहित्य वाचणे आवश्यक आहे. आणि एखाद्या भाषेवर प्रभुत्व असेल आणि त्या भाषेची शब्दसमृद्धी असेल तर लिखाण करणे खूपच सोपे पडू शकते.  तसेच लिहिण्याच्या वेगवेगळ्या शैली जाणून घेण्यासाठीदेखील वाचन करणे खूप आवश्यक आहे.

७) मनोरंजन

वाचण्यामुळे आपले अनेक प्रकारे मनोरंजन होऊ शकते. माणसाला विषयामध्ये खिळवून ठेवण्याची क्षमता साहित्यामध्ये आहे. वेगवेगळ्या विषयांवरील वाचनामुळे जशी आपल्या ज्ञानात भर पडते, तसे आपले मनोरंजन देखील होते.

तर रसिकहो, कविता असो वा  लेख वा कादंबरी….
माणसाने आयुष्यातील काही काळ वाचण्यात जरूर व्यतीत करावयास हवा.

लेखक  – अमर  ढेंबरे