काळ्याशार डोळ्यांच्या महासागरात…

मनाचे पाय
घसरले नकळतच
अन कोसळलो मी
कोसळतच गेलो
खोल त्या गर्तेत
अन वाहवत गेलो
खोल बुडालो
जिथे तळ नव्हताच
कोणताही
तरी
बुडतच गेलो
अन एकवटून सारे श्वास
शोधत राहिलो सहारा
अन अलगद पोचलो
त्या तळाशी…
.
.
.
श्वासांची बंधने
मुक्त केव्हाच झाली होती
अन समोर दिसत होते
शिंपले अन फक्त मोती
आणि भुलून मग
वेचवयास गेलो
चमकती ती मोक्तिकें
.
.
.

नकळतच मग जाग आली
अन भंगले ते स्वप्न
ज्यात 
मी बुडत होतो
त्या समुद्रात
अन काठावरती
दिसत होते
काळीज…
नव्हे…काजळ
तुझ्या नयनांच्या त्या कडांचे
अन मन धजत होते
झोकून स्वतःला
पुन्हा बुडण्यास…आणि डुंबण्यास
अथांग महासागरात त्या
तुझ्या काळ्याशार डोळ्यांच्या
अलगद…आणि….अलवार…
– अमर