तुझ्या आठवणींचे क्षण…

निष्पर्ण फांद्यांना जशा,
वसंतात नव्या पालव्या फुटतात…
तुझ्या आठवणींचे क्षण मला,
तसेच नव्याने भेटतात…

ग्रीष्मातील उन्हाचे,
जसे चटके सर्वांगी…
तुझ्या विरहात होरपळणार,
माझ मन ते अभागी….

मग वर्षा येते,
अन बेधुंद तो बरसतो….
माझ्या नयनातील पाऊस,
तुझ्याचसाठी तरसतो…

शरदात त्याला,
कुठेतरी मग उसंत असते….
कस जगाव तुझ्याविना,
माझ्यासाठी एवढीच एक खंत असते…. 

हेमंत आणि शिशिरात,
सार ना कसं थंड थंड…
हृदयाने मात्र माझ्याशी,
तुझ्याचसाठी केलेलं नेहेमीचच एक बंड….

आता हे ऋतुचक्र,
सदैव असच चालायचं…
तुझ्याशी म्हणून,
माझ्याशीच मी…
किती किती मग बोलायच??  

– अमर ढेंबरे