घे हात हाती – मराठी लघुपट

क्षितिज – एक कवीमनाचा मुलगा आहे. विकास त्याचा मित्र.
नियती हे त्याच्याच कॉलेजमधील एक मुलगी जिच्यावर क्षितिजच प्रेम आहे. क्षितिज त्याच अव्यक्त प्रेम वेळोवेळी त्याच्या कवितेतून मांडत असतो परंतु नियतीला जाऊन बोलण्याचं त्याच धाडस काही केल्या होत नाही.
त्याच बरोबर नियतीला क्षितिजच्या कविता आवडत असतात.व ती स्वतः देखील कविता करत असते परंतु क्षितिज या बाबतीत अजाण असतो.

क्षितिज नियतीवरच प्रेम व्यक्त करतो अथवा नाही. विकास यामध्ये काय भूमिका पार पडतो. नियतीच्या मनात नक्की काय चालू असत या सर्वाचं उत्तर आपणास हा लघुपट पाहिल्यावरच मिळेल.

अमर ढेंबरे यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा काव्यपट चित्रकवितेच्या YouTube चॅनेल वर नक्की पहा.