प्रयत्न – प्रेरणादायी वाक्ये….

“केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे”

समर्थ रामदास स्वामींनी बोललेले हे वाक्य ऐकायला सोपे असले तरी त्यात खूप मोठा अर्थ दडलेला आहे. अनेकदा आपण लोकांना नशिबाच्या नावाने रडताना पाहत असतो व नशीब देत नाही म्हणून तठस्थ बसलेले पाहत असतो…

परंतु केवळ नशिबावरच सगळे असते का?

अर्थातच नाही…. कारण आपण एवढं मात्र नक्की जाणून घ्यायला हवं की कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी आपल्याला प्रयत्न हे तर करावेच लागतात… आपण पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला परिश्रम करणे अटळ आहे…आणि म्हणतात ना कि प्रयत्न करणाऱ्यासमोर नशीब सुद्धा हरत….

एखादे ध्येय साध्य करण्यासाठी आपणास स्वतःला Self Motivate करून प्रयन्त करीत राहणे गरजेचे आहे….