वसंतातल्या कोण्या शुभ्र दुपारी….
वसंतातल्या कोण्या शुभ्र दुपारी,
सागराच्या निळ्याशार पाण्यात,
त्या सूर्याने स्वतःचे प्रतिबिंब पहावयास डोकवावे…
अन मग हजारो लाटांनी,
चकाकते रूप घेऊन स्वतःशीच हसावे…
त्या लाटांचे,
खळखळ हास्य ऐकण्यास,
कोण्या माशाने,
खोल तळातून पटलावर यावे…
अन मग,
नभात हिंडणाऱ्या
उन्मुक्त अधाशी बकाने
त्यास अचूक टिपावे…
आयुष्य असच खळाळत असत
त्या लाटांपरी,
मात्र,
क्षणांच्या त्या लहरीसोबत
माझ्या मनपटलावर
अचानक उमटणारी
तुझी ती प्रत्येक आठवण
मी अशीच टिपत असतो…
किंबहुना
मी टिपावे म्हणूनच
बहुध त्या आठवणी
अलगद मनाच्या पटलावर
येत असाव्यात
सदैव….
कोण जाणे…
– अमर
खूप सुंदर कविता